ब्रेकिंग न्यूज़

गावात प्रवेश करण्यासाठी नालीच्या घाण पाण्यातूच काढावा लागत आहे ग्रामस्थांना मार्ग

भारत 24TV न्यूज. अहमद पठाण औंढा तालुका प्रतिनिधी ता.24/06/2020

औंढा नागनाथ :तालुक्यातील शिरड शहापूर येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला नाली नसल्याने व आहे ती नाली जाम झाल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर येऊन घाण पसरत आहे त्यामुळे गावात प्रवेश करण्याच्या अगोदरच नागरिकांना या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढत गावात शिरावे लागते याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने होत आहे.

औंढा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या शिरड शहापूर येथील राज्य रस्त्यापासून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा नाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडून या खड्ड्यात पाणी साचू दुर्गंधी पसरत आहे त्यातच एखादी गाडी खड्ड्यातून गेल्याने अनेकांच्या अंगावर पाणी उडण्याचे प्रकारही येथे नित्याचेच घडताहेत आता तर पावसाळ्याच्या दिवसात आणखीच दुरावस्था होते त्यामुळे या सांडपाण्याचा ग्रामपंचायतीने वेळीच बंदोबस्त करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी व मागील कित्येक वर्षांपूर्वी झालेला गावात येणारा मुख्य रस्ताही पूर्णतः उखडून गेल्याने त्यालाही जागोजागी खड्डे झाले आहे त्यामुळे बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून दुतर्फा नाली करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

छायाचित्र:गजानन नाईक औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close