ब्रेकिंग न्यूज़

शिक्षक ते तहसीलदार पदापर्यंतचा आर्दर्शवत प्रवास

भारत 24TV न्यूज. अहमद पठाण ( औंढा तालुका प्रतिनिधी ) दि. 25/06/2020


औंढा नागनाथ: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेतून संतोष बंडू अष्टीकर यांची तहसीलदार पदी निवड झाल्याने त्यांचा औंढा नागनाथ येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

संतोष आष्टीकर हे वसमत तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला करंजाळा येथे शिक्षक म्हणून 2013 रुजू झाले यादरम्यान त्यांनी शाळा शिकवत मिळालेल्या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली याच काळात त्यांची 2017 मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली व सध्या ते वाशिम येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत होते दरम्यान मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांची तहसीलदारपदी निवड झाली विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता त्यांनी हे यश संपादित केले त्यांचा हा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श घ्यावा असाच आहे त्यांचे माध्यमिक शिक्षण सेलू येथे झाले होते शिक्षक ते तहसीलदार या पदापर्यंत प्रवास करताना त्यांची पत्नी सरिता स्वामी यांनी साथ दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करावेत व योग्य संदर्भ साहित्याचा वापर केल्यास यश नक्कीच मिळू शकते असे त्यांनी सांगितले. सत्कार प्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी माधव केंद्रे, वन परिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर धोंडगे,वनरक्षक अमोल झिनकरवाड, चंद्रकांत लोंढे, पंजाब चव्हाण, आदींची उपस्थिती होती.

छायाचित्र गजानन नाईक औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close