ब्रेकिंग न्यूज़

औंढा तालुक्यातील शेंदूरसेना येथे केंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय

अहमद पठाण औंढा तालुका प्रतिनिधी 30/07/2020


केंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय…*सगळीकडे राशन दुकानदारच्या संदर्भात तक्रारी होत असताना हिंगोली जिह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात यज्ञ तर असणाऱ्या सेंदूरसेना येथील राशन दुकानदार वैभव सर्जेराव सुपनर यांनी वेळोवेळी राशन पुरवठा केल्याच चित्र पाहायला मिळतंय..केंद्र शासन व राज्य सरकार यांच्यामार्फत येणारा राशन माल व्यवस्थितरित्या प्रत्येक नागरिकांला राशन दुकानदार वैभव सर्जेराव सुपनर मिळवून देतात..आज दिनांक 29 जुलै रोजी केंद्रशासनाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात मिळणारा राशन चा माल दुकानदाराने सेंदूरसेना येथील जिल्हा परिषद शाळा याठिकाणी वाटप केला आहे…यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो माल यामध्ये तांदूळ व गव्हाचा समावेश आहे…केंद्र शासनाच्या या योजनेमुळे घरात अन्नधान्य स्टॉक असल्याच्या प्रतिक्रिया लाभधारकाकडून ऐकायला मिळतात..धान्य वाटप करताना पंचायत समिती सभापती दीपकराव ढेकळे,वसंतराव चिलकेवार, टोपाजी आव्हाड,उमाजी ढेकळे,पांडुरंग मुधळकर,बंडू पोले,चिमणाजी जाधव,दिलीप ढेकळे,विलास सुपनर,रावसाहेब जाधव,बबन थोरात,वैजनाथ मुकामाले, शंकर आव्हाड,परमेश्वर लोंढे,बालाजी सुपनर,गजानन देवकते, आदी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close