ब्रेकिंग न्यूज़

औंढा नागनाथ. गोरखनाथ वाई येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी साजरी होणारी बैल यात्रा रद्द

अहमद पठाण औंढा तालुका प्रतिनिधी 02/08/2020


.. अहमद पठाण तालुका प्रतिनिधी . औंढा नागनाथ. गोरखनाथ वाई येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी साजरी होणारी कर यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रद्द करण्यात म्हणून आलेली आहे. या करीच्या दिवशी हिंगोली,परभणी,नांदेड़ अश्या आजूबाजुच्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या बैल जोड्या घेउन गोरखनाथाच्या दर्शनाला येतात दरवर्षी किमान 70-80 हजार बैलजोड्या वाईला येतात,त्यांच्या साठी महाप्रसादाची सोय मंदीर ट्रस्ट च्या वतीन करण्यात येत होती परंतू ह्या वर्षी कोरोना असल्यामूळे सोशल डिस्टंसींग पाळावी लागत आहे त्यामुळे एवढी गर्दी जमवणे योग्य होणार नाही म्हणुन मंदीर ट्रस्ट च्या वतीने एक बैठक बोलावण्यात आली त्यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री दुलबाराव कदम,उपाध्यक्ष शामराव कदम,सचिव बाबुराव कदम व गावकरी मंडळी उपस्थीत होते,या बैठकीत सर्वानुमते सण यावर्षी रद्द करण्याचा ठराव संमत करण्यात आला आणि मंदीर ट्रस्टच्या वतीने कूरुंदा पुलिस स्टेशनचे पुलिस निरिक्षक व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close