ब्रेकिंग न्यूज़
Trending

हिंगोली जिल्ह्याचे उर्दू शिक्षकांनी घेतले ऑनलाइन शिक्षणाचे धडे

नवीद अहेमद वसमत तालुका प्रतिनिधी 27/08/2020

हिंगोली :
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे द्वारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली मार्फत जिल्ह्यात उर्दू शिक्षकांसाठी प्रत्येक महिन्यात नवीन शिक्षण संकल्पना व शिक्षण पद्धती तसेच शिक्षण क्षेत्रात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम यांची जाणीव करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर उर्दू शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षण परिषद घेण्यात येते.
सध्या कोरोना (कोविड-19) संसर्ग टाळण्यासाठी व संक्रमण वाढू नये ह्या करिता महाराष्ट्र शासनातर्फे उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे *शाळा बंद पण शिक्षण आहे* ह्या संकल्पनाद्वारे शिक्षक ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता शिक्षण सुरू ठेवत आहे.
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाऊन सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) पाडून मार्गदर्शन करत आहे. अनेक शाळा ऑनलाइन शिक्षण पद्धतीचाही वापर करीत आहेत.

उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या अडचणी व त्यांचे समाधान कशाप्रकारे करता येईल. तसेच ह्या लॉक डाऊन मध्ये ऑफलाईन पद्धतिने विद्यार्थ्यांना गृहपाठ व शिक्षणाचे धडे कशाप्रकारे देता येईल ह्यासाठी ऑनलाइन उर्दू शिक्षण परिषद झूम ॲप द्वारे घेण्यात आली. उर्दू शिक्षण परिषद च्या पहिल्या टप्प्यात 46 शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली द्वारे अधिव्याख्याता सुखदेव देठे, शेख रुबीना व राज्य अभ्यास गटाचे सदस्य गुलाम जावेद यांनी प्रशिक्षण आयोजनात सहभाग घेतले. सुलभक म्हणून रफीक अन्सारी, मिन्हाज अहमद, अब्दुल खुदुस यांनी यांनी आपल्या दिलेल्या विषयांची तासिका घेतली. उत्कृष्ट प्रमाणे सदरील प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजन करिता प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close