ब्रेकिंग न्यूज़

मृत कोरणा रुग्णांचे 1 लाख 41 हजाराचे बिल सिक्युरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सर्रासआर्थिक लूटमार

रितेश देशमुख वाशीम तालुका प्रतिनिधी 03/09/2020

वाशीम :- स्थानिक सिक्युरा हॉस्पिटलमध्ये कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या नावाखाली रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे येथे एका मृत कोरोना रुग्णांचे 1लाख 41 हजार रुपये एवढे बिल काढले आहे तेव्हा सदर हॉस्पिटलची मान्यता रद्द करून गंभीरआजाराच्या रुग्णासाठी पर्यायी व्यवस्था करावी सोबतच हॉस्पिटल ने वसूल केलेली रक्कम रुग्णांना परत दयावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे ठाकरे यांनी निवेदनात म्हटले की अनसिंग येथील सौ भीमराव चंद्रवशी व स्व अशोक शंकरराव वर्हाडे दोघे कोरोना आजाराच्या कारणाने स्थानिक सिकुरा हॉस्पिटलमध्ये भरती होते दरम्यान ,यापैकी अशोक शंकरराव वऱ्हाडे यांचा सिकुरा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये रक्त दिले नाही ,शिवाय औषधीच्या बिलाच्या रकमेएवढी औषधी सुद्धा दिली नाही तरीही सौ सुलोचना चंद्रवशी यांच्याकडून 82 हजार रुपये तर स्व अशोक वर्हाडे यांचा मुलगा राम वर्हाडे यांच्याकडून 1 लाख 41 हजार बिल हॉस्पिटल प्रशासनाने वसूल केले त्यामुळे हा प्रकार मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे रकमेच्या बिलावर पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांची सही नाही व बिलावर हॉस्पिटल चे नाव सुद्धा नाही सिकुरा हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी तसेच रुग्णांची रक्कम परत करावी असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close