ब्रेकिंग न्यूज़

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक सुविधांंचा अभाव… पिण्याचे पाण्याचे फ्रीजर बंद महिला शौचालयाचे दरवाजे गायब रुग्णालय बनले घाणीचे साम्राज्य…

रितेश देशमुख वाशीम तालुका प्रतिनिधी / 04/09/2020

अँकर:-: वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु असलेल्या भोंगड्या कारभारामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांंचे भयानक हाल होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णा मधून रोष व्यक्त केला जात आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे नागरिक खाजगी रुग्णालय मध्ये उपचार न घेता जिल्हा सामान्य रुग्णालयकड़े धाव घेत आहे.परंतु उपचार घेतांंना अनेक सुविधांंचा अभाव असल्यामुळे नागरिकांंचे हाल होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये पिण्याचे पाण्याचा फ्रीज़र बसवलेला आहे पण पिण्यासाठी पाणी नाही आहे तसेच महिला शौचालय आहे परंतु त्याला दरवाजे नाही व रुणालयातून येणारा दूषित पाणी हा रुग्णालया समोरील रस्त्यावर येत आहे.अश्या प्रकारे हा संपूर्ण रुग्णालय घाणीचा साम्राज्य बनला आहे.

विशेष म्हणजे यासर्व होत असलेली नागरिकांंची गैरसोय बद्दलची माहिती जिल्ह्या सामान्य रुग्णालयचे जिल्ह्या शल्य चिक्तिसक डॉ. सोनटक्के यांना माहित आहे तरी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्या सामान्य रुग्णालय मधील पिण्याचे पाणीचे फ्रीज़र सुरू व्हावे व महिला शौचालय मधील गायब झालेले दरवाजे लावण्यात यावे तसेच रुग्णालय परीसरातील होत असलेली घाणीचे त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी जनते मधून होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close