ब्रेकिंग न्यूज़

कोरोना अलर्ट आज गुरुवार दि. १० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार

राजेश अमृतकर विदर्भ ब्युरो चीफ 10/09/2020

*प्राप्त अहवाल- ४०६*
*पॉझिटीव्ह- ७५*
*निगेटीव्ह-३३१*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गिता नगर, गौरक्षण रोड व वाशिम बायपास येथील प्रत्येकी तीन जण, दामाणी हॉस्पीटल मागे व दुबे वाडी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित उमरी, गायत्री नगर, जीएमसी, निंबा, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, देशमुख फैल, विठ्ठलवाडी व हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४ जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ५७ जण, आयकॉन हॉस्पिटल येथील तीन जण, हॉटेल रिजेन्सी येथील तीन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २५ जणांना असे एकूण १३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४०५७+९१६+१४७=५१२०*
*मयत-१७३*
*डिस्चार्ज- ३८५८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१०८९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close