ब्रेकिंग न्यूज़

पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर सतत गैरहजर उपचाराविना पशू चे हाल पशुपालकात रोष

अहमद पठाण औंढा ता. प्रतिनिधी 13/09/2020

औंढा नागनाथ : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरावर उपचार करणारे डॉक्टर नेहमी गैरहजर राहत असल्याने व सध्या जनावरावर आलेल्या लंम्पी रोगाने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त आहेत त्यातच लंम्पी लागण किंवा इतर आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या पशूला पशुवैद्यकीय डॉक्टर अभावी प्रतीक्षा करावी लागत आहे परिणामी उपचाराविनाच वापस जावे लागत आहे त्यामुळे पशुपालकात रोष व्यक्त होताना दिसत आहे.

सध्या मानव कोरोणाने तर जनावरे पशू लंम्पी आजाराने त्रस्त आहेत त्यामुळे या रोगावर त्वरित उपचार केल्यास सदरील आजार बरे होत आहेत परंतु औंढा नागनाथ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशू वर उपचार करणारे डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्याने ग्रामीण भागातून उपचारासाठी दवाखान्यात आणलेल्या पशु जनावरांना डॉक्टरच्या गैरहजेरीमुळे उपचाराविना वापस न्यावे लागत आहे. आधीच पशुपालक पशुवर आलेल्या लंम्पी रोगाने परेशान आहेत त्यातच उपचारासाठी दवाखान्यात आणलेल्या पशुवर उपचार करणारे डॉक्टरच राहत नसल्याने पशुपालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे केवळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे उपचाराअभावी दगावली सुध्दा आहेत त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे तालुक्यावरचा दवाखाना असल्याने येथे औंढा शहरासह दरेगाव, वाळकी,तळणी, असोला, गोळेगाव, माथा, अंजनवाडी, कोडसी, जांब, राजापूर, आदींसह तालुक्यातील विविध गावातून पशुपालक पशूंना उपचारासाठी आणतात परंतु येथे पशुवैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने पशूंना उपचारांविनाच वापस न्यावे लागत आहे तालुक्यावरील दवाखान्याची अशी स्थिती आहे तर ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्याची काय स्थिती असेल हे यावरून दिसून येते.
त्यामुळे लंम्पी रोगाने ग्रासलेल्या जनावरावर उपचारांची अत्यंत गरज आहे मात्र पशुवैद्यकीय अधिकारी कामात कसूर करत असल्याचे दिसून येत आहे आणि ही बाब नित्याचीच आहे परंतु सध्या शेतकऱ्याच्या पशुवर ओढवलेल्या लंम्पी रोगाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आता जोर धरत आहे.

छायाचित्र गजानन नाईक औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close