ब्रेकिंग न्यूज़

शिरड शहापूर उर्दू शाळेत शा.पो.आ धान्य वाटप महाराष्ट्र शासन व भारत सरकार तर्फे प्रत्येक शाळेला पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार

अहमद पठाण औंढा ता प्रतिनिधी 15/09/2020

महाराष्ट्र शासन व भारत सरकार तर्फे प्रत्येक शाळेला पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार माहे एप्रिल मध्ये कोविड-19 (कोरोना विषाणू) संसर्ग टाळण्यसाठी दक्षता कारणात्सव पूर्ण देशात मार्च महिन्यापासून लॉक डाऊन असल्याने सर्व शाळाही बंद होत्या म्हणून पुरवठा झाला नव्हता.ह्या लॉक डाऊन मध्ये गरीब व शेतमजूर होतकरू लोकांची शासामार्फत दखल घेऊन तसेच विद्यार्थ्यांना पोषण आहार च्या उद्देशाने कंत्राटदारांकडून उर्वरित (माहे एप्रिलचा शा.पो.आ.) पुरवठा धन्येच्या स्वरूपात थेट विद्यार्थी (लाभार्तींना) वाटप करण्यात आला.
भारत सरकार व महाराष्ट्र शासातर्फे प्रत्येक शासन मान्य अनुदानित विना अनुदानित शाळांना त्यांची लाभार्ती (विद्यार्थी) संख्ये प्रमाणे हा पुरवठा करण्यात येत असून सध्या वर्ग पहिला ते पाचवा पर्यंत ३.४०० कि.ग्रा तांदूळ,हरभरा १.२०० कि.ग्रा,मुगदाळ ६०० ग्राम प्रति विद्यार्थी प्रमाणे तसेच वर्ग साहावा ते आठवा पर्यंत तांदूळ ५.१०० कि.ग्रा ,हरभरा १.८०० कि.ग्रा,मुगदाळ ९०० ग्राम प्रति विद्यार्थी प्रमाणे वाटप करण्यात आले.
सदरील वाटप कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळा वेळापत्रक देऊन हे वाटप करण्यात आले वाटप वेळेस व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख ताजुद्दीन, सय्यद असलम, पत्रकार अहमद पठाण, मुख्याध्यापक गुलाम जावेद, शिक्षक अफरोज खान उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close