ब्रेकिंग न्यूज़

माॅबलिंचिंग चा प्रयत्न करणार्यावर कडक कार्यवाही करावी अश्या मागणी चे परळीत तहसीलदार मार्फत गृहमंत्रीना निवेदन

परळी वैजनाथ ता. प्रतिनिधी / 18/09/2020

परळी वै
दिनांक १६ सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर(प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कार मध्ये तांत्रिक अडचणी झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. या वेळी काही अज्ञात समाजकंटकांनी जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामुद्दीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खुप चिंताजनक बाब आहे या पुर्वी पुण्यात मोहसीन शेख व पालघर येथे साधुंची माॅबलिंचिंग द्वारे हत्या करण्यात आली होती… आता धारुरच्या लोकांना धर्माच्या आधारावर मारहाण करणे म्हणजे माॅबलिंचिंगचाच भाग आहे व ही एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे. जिल्ह्यात व राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी
सकल मुस्लिम युवक परळी तर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत गृहमंञीना निवेदन देऊन करण्यात आली.तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंञी यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपीना शिक्षा करण्यास पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. या वेळी शेख मुख्तार,शेख अख्तर, शेख समी, गफ्फार शाह खान, शेख मुदस्सीर, मजास इनामदार, शेख अयाज, अहद खान आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close