ब्रेकिंग न्यूज़

एकाची जमीन दुसऱ्याच्या नावे करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी यांचे विरुद्ध कारवाही करणे कामी जाणीपूर्वक टाळाटाळ

नवीद अहेमद बसमत ता प्रतिनिधी /20/09/2020

वसमत तालुका प्रतिनिधी:शेख नवीद अहेमद वसमत तालुक्यातील टाकळगाव तलाठी सज्जा तील मौजे भोरीपगाव येथील गट क्रमांक 0४ मधील शेतकरी अब्दुल मजीद अब्दुल रहमान क्षेत्रफळ 34 आर यांची मालकीची जमीन तलाठी श्री मुंडे व महसूल मंडळ अधिकारी यांनी अर्थपूर्ण संगनमता आधारे सदर जमीन अब्दुल मजिद अब्दुल उस्मान यांचे नावे करून संबंधित मूळ मालक जमीन मालकाची व प्रशासनाची फसवणूक केली त्यामुळे सदर प्रकरणी संबंधित मूळ जमीन मालक अब्दुल मजिद अब्दुल रहमान यांनी व नदाफ मोहम्मद बशीर खान माहिती अधिकार कार्यकर्ता ( आरटीआय) यांनी जिल्हा अधिकारी हिंगोली यांना पूर्ण पुराव्यानिशी तक्रार देऊन संबंधित तलाठी व महसूल मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी माननीय तहसीलदार वसमत यांना आदेश देऊन संबंधित तलाठी व महसूल मंडळ अधिकारी यांचे विरोध कारवाही करून अहवाल सादर करणे कामी आदेशित करून देखील सदर प्रकरणात माननीय तहसीलदार वसमत हे संबंधित तलाठी व महसूल मंडळ अधिकारी यांच्यासोबत अर्थपूर्ण संगणमत करून त्यांना सदर प्रकरणात सहीसलामत वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्याचा आरोप तक्रारदार नदाफ अहमद बशीर खान माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय )यांनी केला आहे तसेच सदर प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत असून जनतेकडून संबंधित तलाठी महसूल मंडळ अधिकारी यांचा विरोध कारवाईची मागणी जोर धरीत असून माननीय तहसीलदार वसमत यांच्या गैरकारभाराची चौकशी ची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close