ब्रेकिंग न्यूज़

कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून पावसा ने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी

अहमद पठाण औंढा ता. प्रतिनिधी 27/09/2020

औंढा नागनाथ :राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडून औंढा तालुक्यातील हिवरा जाट येथील शेतकरी ग्यानबा उघडे यांच्या शेतात जाऊन सततच्या पावसाने नुसकान झालेल्या सोयाबीन कापूस हळद या पिकाची पाहणी केली व पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा कृषी अधीक्षक लोखंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तालुका कृषी अधिकारी भालचंद्र वाघ,नगरसेवक राम कदम, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, राम मुळे, तलाठी विजय सोमटकर,संजय कंचले,आदींसह अधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांची उपस्थिती होती यादरम्यान शेतकरी ग्यानबा उघडे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना पावसाने नुसकान झालेल्या पिकाची हकीगत सांगितली व पावसामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले त्यामुळे उभ्या सोयाबीनच्या शेंगला अंकुर फुटले व कापसाच्या बोंडाना बुरशी येऊन काळे पडले तर हळद पिकावर ही करपा पडल्याने सर्वच पिकाचा हंगाम गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुसकान भरपाई देण्याची मागणी त्यांनी मंत्री भुसे यांच्याकडे केली यावर कृषिमंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत एकाचे पिकाचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करणार असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी औंढा येथे विकेल ते पिकेल या नागनाथ शेतकरी बचत गटाने उभारलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या भाजीपाला कृषी स्टॉलचे फीत कापून उद्घाटन केले यानंतर चोंढी काटोडा येथेही त्यांनी पावसाने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close