ब्रेकिंग न्यूज़

वसमत तालुक्यातील टाकळगाव सज्जा चे तात्कालीन तलाठी मुंडे यांच्या निलंबना चा प्रस्ताव

नवीद अहेमद ता. प्रतिनिधी 29/09/2020

वसमत तालुक्यातील मौजे टाकळगाव सज्जा चे तत्कालीन तलाठी तथा सज्जा मौजे आंबा सध्याचे कार्यरत तलाठी श्री मुंडे यांना मौजे भोरिप गाव तालुका वसमत येथील एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याचे नावे बेकायदेशीर रित्या फेरफार केल्यास संबंधित दोषी धरून त्यांचे विरुद्ध माननीय प्रभारी तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी त्यांचे एक वर्षाची वेतन वाढ रद्द करून त्यांना निलंबित करणे कामी प्रस्ताव माननीय उपविभागीय अधिकारी वसमत यांच्याकडे सादर केला आहे. सदर प्रस्तावानुसार माननीय उपविभागीय अधिकारी वसमत हे काय कारवाई करतात तथा संबंधित तक्रारदार नदाफ मोहम्मद बशीर खान माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI) हे माननीय उपविभागीय अधिकारी वसमत यांना भेटून सदर प्रकरणी त्वरित कार्यवाही करणे कामी विनंती करणार असून उर्वरित दोषी महसूल मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे विरुद्ध देखील कारवाई होणे कामी माननीय उपविभागीय अधिकारी वसमत यांच्याकडे मागणी करणार आहे. त्यामुळे सदर कारवाही मुळे वसमत तहसीलच्या सर्व प्रशासन मध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वसमत तालुक्यातील सर्व जनतेचे सदर कार्यवाही संबंधी उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून सर्व जनतेतून संबंधित तलाठी महसूल मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close