ब्रेकिंग न्यूज़

औंढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवका च्या पदाधिकाऱ्यांची निवड आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

अहेमद पठाण ता. प्रतिनिधी 30/09/2020

औंढा नागनाथ :तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवण्यासाठी सोमवारी येथील विश्रामगृहात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांची आमदार राजू भैया नवघरे यांच्या उपस्थितीत निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यात औंढा तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्षपदी लक्ष्मण कदम, संघटकपदी निळकंठ नेव्हल, सचिव अंकुश चव्हाण, कोषाध्यक्ष इंद्रजीत कदम, सहसचिव लखन कदम, सरचिटणीस स्वप्निल ईघारे, उपसंघटक योगेश सांगळे, तर सदस्य म्हणून संतोष जाधव, तुकाराम देशमुख, धनंजय कागणे, गणेश ढोबळे, आदींची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी आमदार राजू भैया नवघरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संजय दराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आदित्य आहेर, तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहमद पठाण,बाबासाहेब गायकवाड, प्रवीण टोम्पे, गोपाल मगर, गजानन सांगळे, सुभाष कावरे, भगवान ईघारे, मुंजा वावरे, बाळूमामा ढोरे, चंद्रकांत कदम, गजानन ढोरे, त्र्यंबक कदम, आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष आदित्य आहेर यांनी केले तर आभारप्रदर्शन गोपाल मगर यांनी केले.

छाया: गजानन नाईक औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close