ब्रेकिंग न्यूज़

काँग्रेसचे औंढा तहसिलवर धरणे आंदोलन, शेतकरी व कामगार विरोधी कायदा रद्द करा

अहेमद पठाण औंढा ता. प्रतिनिधी 03/10/2020

औंढा नागनाथः- तहसिलवर काँग्रेसचे शेतकरी व कामगार विरोधी कायदा मागे घ्या, या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आलेय. राज्य सरकारने संसदेत शेतकरी व कामगार विरोधी कायदा मंजूर करून शेतकऱ्यावर घोर अन्याय करणारा कायदा अमलात आणण्याचा अघोरी प्रयत्न करुन भाजपा सरकारने संसदेत लोकशाहीचा खूण केलाय. या कायद्यामुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त होऊन मोठ्या संकटात सापडलाय. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदा तात्काळ मागे घेवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलीय.जुलमी व हुकुमशाही आणी शेतकरी कामगार यांच्यावर होणारा आन्यायकारी कायदा तात्काळ रद्द न झाल्यास देशातील सर्व शेतकरी व कामगार एकजुटीने रस्त्यावर उतरुन हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही पध्दतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीय.हे धरणे आदोलन खासदार राजीव सातव व माजी आमदार डाँ सतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली झालेय.धरणे आंदोलन तीन ऑक्टोंबर रोजी औंढा तहसिलच्यागेट समोर करण्यात आले .आंदोलन एक तास चालले. असून यामध्ये डॉक्टर संतोष टारफे माजी आमदार सह कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त केले. व त्यानंतर औंढा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनास काँग्रेसचे पक्ष निरीक्षक जितेंद्र देहाडे,माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य बाबाराव नाईक ,रमेश जाधव, सुमेध मुळे ,नंदकुमार पाटील, सुधिर राठोड,माणिकराव पाटील , पंकज जाधव , गजानन सोळंके, माणिकराव करडिले , जावेद इनामदार, किरण पाईकराव ,प्रभाकर नागरे, स्वाती वाखरकर ,शारदाताई काळे,राधिका चिंचोलीकर, शोभाताई मोगले,ज्योतिताई धुळे, बालाजी करडिले , शाहू सोळंके, विलास मंडलिक, विकी देशमुख, संदीप गोबाडे ,सुनील जोंधळे ,ताहेरखा पठाण ,जावेद भाई ,. कुतुब सर.उपसरपंच. शिरड शहापूर .संतोष जाधव, आलिम खतिब. नदीम पिंजारी ,मनीष शिरसाट, आदी कार्यकर्ते या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने हजर होते. या धरणे आंदोलनाला पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे , साह्याक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे सह जमादार भारत घ्यार , गणेश नरोटे,यशवंत गुरुपवार , राजकुमार सूर्य आदींनी कडक बंदोबस्त दिला होता.

छायाचित्र दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close