ब्रेकिंग न्यूज़

*वसमत शहरातील बंद पडलेली सार्वजनिक वाचनालय तात्काळ सुरू करण्यासाठी MIM पार्टीच्या वतीने निवेदन दिले*

नवीद अहेमद ता. प्रतिनिधी 12/10/2020

वसमत: वसमत नगर परिषदला एम आय एम च्या वतीने निवेदन देण्यात आले नगर परिषद हद्दीतील व हद्दीबाहेर सार्वजनिक वाचनालय गेली सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे वाचनालयाचे ग्रंथ संपदा धुळीस पडली आहे वसमत नगर परिषदेतील सार्वजनिक वाचनालयतिल विविध विषय विषयावरील पुस्तके कादंबरी गोष्टीची पुस्तके अनेक प्रकारची दैनिक असल्यामुळे तिथे येणाऱ्या वाचकांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून सार्वजनिक वाचनालय बंद असल्यामुळे वृद्ध तरुण व विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुस्तके वाचनात येत नसल्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे अडचणीला तोंड द्यावे लागत आहे .मा.मुख्य अधिकारी साहेब आपल्या कार्यालय मार्फत बंद करण्यात आलेली नगर परिषद हद्दीतील व नगर परिषद हद्दीच्या बाहेरील सुद्धा सार्वजनिक वाचनालय तात्काळ सुरू करून वृद्ध तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धी मध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोणातून वाचनालय तात्काळ सुरू करावे असे निवेदन एमआयएमचे इरफान पठाण व त्यांचे कार्यकर्ते यांनी निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close